Fire Department Recruitment 2022 | मुंबई अग्निशमन दलातील 910 पदांची भरती प्रक्रिया लवकरच 2022
Fire Department Recruitment 2022
Fire Department Recruitment 2022 : Mumbai fire brigade recruitment will be soon. As many as 910 vacancies will be recruited for the post of Firefighter and the advertisement will be released soon.
The Mumbai Fire Force recruitment process which has been stalled for the last few years will start soon. As many as 910 vacancies for the post of Firefighter will be recruited and the advertisement for the same will be released soon. The age requirement for candidates has been relaxed up to two years as in police recruitment.
Due to the crackdown on Maratha reservation, layoffs and Corona, the stalled recruitment process in the Mumbai fire brigade is likely to be completed now. In 2017 the recruitment was done earlier, the same recruitment will be done now. The process includes physical examination, medical examination of candidates who have passed 12th in traditional manner. The Mumbai Fire Brigade has a manpower of around 3000 firemen, officers and drivers. 2500 of them are fire fighters. However, due to promotion or retirement, the posts have largely become vacant.
The fire brigade chief Sanjay Manjrekar informed that this recruitment will be done for these posts.
The recruitment process will be held at Bhavdevi Maidan in Dahisar West and its filming will also be done.
The fire brigade has recently invited tenders for that.
As the age limit has been increased by two years in police recruitment due to layoffs, relaxation will also be given in this recruitment and it has been given administrative approval recently, the officials said. So now the age limit for open group will be 27 years instead of 25 and the same limit for reservation will be 32 years instead of 30. Officials said that it will also be considered whether a waiting list can be made for the continuously vacant post.
For more information about Fire Department Recruitment 2022, age limit, salary, education, how to apply, last date and new updates, you must visit jobmaharashtra.com.
मुंबई अग्निशमन दलातील 910 पदांची भरती प्रक्रिया लवकरच 2022
Fire Department Recruitment 2022 : मुंबई अग्निशमन दलाची भरती लवकरच होणार आहे. अग्निशामक पदासाठी तब्बल 910 रिक्त पदांची भरती केली जाणार असून त्यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक पदासाठी तब्बल 910 रिक्त पदांची भरती केली जाणार असून त्यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल. पोलिस भरतीप्रमाणे उमेदवारांसाठी वयाची अट दोन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण, टाळेबंदी आणि कोरोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये यापूर्वी भरती झाली होती, तीच भरती आता केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये पारंपारिक पद्धतीने बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. मुंबई अग्निशमन दलाकडे सुमारे 3000 अग्निशमन कर्मचारी, अधिकारी आणि चालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी 2500 अग्निशमन दलाचे जवान आहेत. मात्र, पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत.
या पदांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.
दहिसर पश्चिम येथील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही होणार आहे.
त्यासाठी अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.
टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ करण्यात आली असल्याने या भरतीमध्येही शिथिलता देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा 25 ऐवजी 27 वर्षे आणि आरक्षणासाठी हीच मर्यादा 30 ऐवजी 32 वर्षे असेल. सातत्याने रिक्त असलेल्या पदांसाठी प्रतीक्षा यादी करता येईल का, याचाही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Table of Contents