News
महत्त्वाचे – राज्यात सहा हजार शिक्षकांची पदभरती !

Maharashtra Shikshak Bharti 2021 : Shikshak Bharti 2021 update Pavitra Portal Shikshka Bharti 2021 – Maharashtra Shikshak Bharti Updates for 2021 are declared here. The updates & Details about Shishak Bharti will be updated on this page. As per the latest News Shikshka Bharti is on hold due to Corona effect. But Large number candidates are waiting for this Shikshka Bharti Online registrations process 2021.
Shikshak Bharti 2021 – राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली. मात्र, या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागली, मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील 5800 जागा भरल्या उर्वरित जागा 6000 अजून भरणे बाकी आहे. या मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचा मोठा सहभाग आहे.
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉगिन करुन 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.
यानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहोत. एसीबीसी या प्रवर्गात जे उमेदवार आहेत व ज्यांना ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 14 जानेवारीपर्यंत लॉगिन करून बदल करावयाची मुदत दिली आहे. बदलाची मुदत 26 जानेवारी अखेर करावी व त्यानंतर ही भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी.
– ऍड. परमेश्वर इंगोले-पाटील, राज्य अध्यक्ष, रयत संकल्प डी. एड्., बी. एड् संघटना.
-
आठवी व दहावी वर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2021.
-
महा मेट्रो पुणे मध्ये 139 पदांची भरती.
-
दहावी बारावी व पदवीधरांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3777 पदभरती.
-
AAI मुंबईत 548 पदांची भरती.
- दहावी व आयटीआय वर महावितरण मध्ये 73 पदांची भर्ती.
-
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे भरती.
-
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नविन 172 जागांसाठी भरती 2020.
-
दहावी बारावी व पदवीधरांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3777 पदभरती. – मुदतवाढ