Connect with us

News

आता तयारीला लागा…MPSC च्या परीक्षा मार्चमध्ये

Published

on

MPSC Exams Date Announcement

MPSC Exams Date Announcement : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्चमध्ये होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत निर्णय घेतला असून आज परीक्षांच्या तारखांबद्दल आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांना विलंब झाला आहे. या परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षा कधी जाहीर होणार याच्या प्रतीक्षेत होते. तसंच लवकरात लवकर या परीक्षा पार पाडल्या जाव्या अशी मागणीही करण्यात येत होते. दरम्यान, आता मार्च महिन्यात या परीक्षा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसंच परीक्षांची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती