News
31 ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद

31 ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
करोना महामारीची परिस्थिती सामान्य न झाल्याने राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशपातळीवरही अनलॉक 3 साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार 31 ऑगस्टपर्यंत देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. हा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर घेण्यात आला आहे.
वरीलप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी कंटेन्मेंट झोन मध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाऊनचे नियम शिथील केले जाणार नाहीत. मार्च महिन्याच्या मध्यापासून देशातील सर्व शाळा, महाविद्यालेय बंद आहेत. कोचिंग क्लासेसही लॉकडाऊनमध्ये बंद झाले आहेत. या सर्व ठिकाणी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
गृहमंत्रालयाने सांगितलं आहे की, ‘देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. ऑनलाइन शिक्षणाची परवानगी आहे आणि याला अधिक प्रोत्साहित केले जाईल.’ याव्यतिरिक्त मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे देखील बंदच राहणार आहेत. मात्र 5 ऑगस्ट 2020 पासून योगाभ्यास आणि व्यायामशाळांना कार्यरत राहण्याची परवानगी दिली जाणार आहे, यासाठी विशेष मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी केली जाणार आहे.
ENGLISH
Schools, colleges and coaching classes closed until August 31st
The lockdown in the state has been extended till August 31 as the Corona epidemic situation has not returned to normal. The Union Home Ministry has also issued guidelines for Unlock 3 at the national level. Accordingly, all schools, colleges and coaching classes in the country will be closed till August 31. This decision has been taken after extensive discussions with the States and Union Territories.
Although the unlock process is ongoing as above, the lockdown rules in the Containment Zone will not be relaxed until 31 August 2020. All schools and colleges in the country have been closed since mid-March. Coaching classes are also closed in lockdown. In all these places, education is started online.
The Home Ministry said, “All schools, colleges and coaching classes in the country will remain closed till August 31.” Online education is allowed and will be further encouraged. ‘In addition, the metro, cinemas, swimming pools, amusement parks, bars, halls will also remain closed. However, from August 5, 2020, yoga classes and gyms will be allowed to operate, for which a special standard operating procedure (SOP) will be issued by the Ministry of Health and Family Welfare.
- जलसंपदा विभागात नविन पदांची भरती 2021.
- महावितरण मध्ये नविन 368 पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
- महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती 2021.
-
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 239 जागांसाठी भरती 2021.
- 10वी वर RBI मध्ये 870 पदांची भरती 2021. – संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 899 जागांसाठी भरती 2021.